असं केलं तर तालुका प्लेस चे विद्यार्थी देखील एन.आय.टी/आय.आय.टी मध्ये शिकायला जातील.

असं केलं तर तालुका प्लेस चे विद्यार्थी देखील एन.आय.टी/आय.आय.टी मध्ये शिकायला जातील.

तालुका आणि गाव पातळीला आपण बघत आलोय, केवळ शिक्षक पालक एन.आय.टी/आय.आय.टी साठी प्रयत्न करतात आणि त्या हेतूने ते आपली मुलं लातूर, कोटा, पुणे अश्या शहरी भागातील कोचिंग सेंटर मध्ये शिकण्यासाठी पाठवितात. अर्थात यात अगदी बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. शिवाय या प्रक्रियेत येणार खर्च प्रचंड असतो.

मग काय केलं म्हणजे आपली मुलं इथेच ११ वी/१२ वी करून अपेक्षित ठिकाणी पुढील शिक्षणासाठी जातील?
पालक मित्रानो, सर्वप्रथम राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांचे स्वरूप लक्षात घ्या. जर तुम्हाला तुमचे मुलं एन.आय.टी/आय.आय.टी किंवा दर्जेदार कॉलेजात पाठवायची असतील तर त्यांना जे.ई.ई. सारख्या परीक्षेत यशस्वी व्हावे लागेल. आणि नुसते मोठे कोचिंग लावून हे होत नाही.
मुलांना इयत्ता ८ वी पासूनच ट्रेनिंग द्यायला हवी. “मेडिकल/आय.आय.टी” फाउंडेशन पक्के करायला हवं. तसेच या दरम्यान त्यांना वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षेला बसवायला हवं.
तसेच १० वी नंतर लगेचच तयारी सुरु व्हायला हवी. तालुक्याच्या ठिकाणी “गायरस” सारख्या सायन्स अकॅडमी पूर्ण वेळ बॅचेस घेतात. त्यांनी मुलं चांगल्या ठिकाणी पाठविण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे योग्य मार्गदर्शन, चांगले स्टडी मटेरियल, योग्य प्लॅनिंग आणि पूर्ण वेळ बॅच तुम्हाला एन.आय.टी/आय.आय.टी पर्यंत घेऊन जाईल.

कुठल्याही क्षणी माणूस निसर्गापेक्षा श्रेष्ठ नाही, आपले श्रेष्ठत्व केवळ आपल्यापुरते मर्यादित

कुठल्याही क्षणी माणूस निसर्गापेक्षा श्रेष्ठ नाही, आपले श्रेष्ठत्व केवळ आपल्यापुरते मर्यादित

हुशार असाल तर बुद्धिमान व्हा, आणि बुद्धिमान असाल तर चतुर व्हा…

कुठल्याही क्षणी माणूस निसर्गापेक्षा श्रेष्ठ नाही, आपले श्रेष्ठत्व केवळ आपल्यापुरते मर्यादित

या लढाईत नेमकी, जिंकणार कोण? ही खरंच लढाई कि एक अनैसर्गिक कृत्यातून माणसासमोर अकस्मात आलेली नैसर्गिक आपत्ती?
कसं देणार या प्रश्नाचे उत्तर आपण? समस्त प्राणीमात्रात केवळ आपणच फार पीडित आहोत का? कि, ही केविलवाणी भावना केवळ मनुष्यजातीपुरतीच मर्यादित आहे?
विश्वाचे सूक्ष्म किंवा विराट स्वरूप जे आपण जाणतो, ते कदाचित इतर सजीव जाणत नसावे. आणि म्हणून हा अहंकार, अभिमान, गर्व किंवा आणखी याला काहीही म्हणा, दुखावला गेला आहे काय?
मृत्यूच्या भयाने आपण सैरभैर झालोय काय? आणि जर झालोच असेल तर, मृत्यू अटळ आहे, जस जन्म एक सत्य आहे तसेच मृत्यू दुसरं हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे, मग कशासाठी एव्हडी तळमळ.

Er. Sandeep Chavan, Gyrus Education Pvt. Ltd

खरं तर मृत्यू कशामुळे येणार हे ठाऊक झालं कि मग तगमग जास्त होते, आणि त्यातून सुटता येईल का यासाठी संघर्ष सुरु होतो. त्यासाठी आपल्याकडे अनेक मार्ग आहेत, अर्थात विज्ञान, अध्यात्म, श्रद्धा, अंधश्रद्धा या मार्गांचा अवलंब करून आपण येणाऱ्या त्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टीला आपण थोपविण्याचा प्रयत्न सुरु करतो.
खरं तर ही क्षमता सर्व जीवित प्राणिमात्रांना सारख्या प्रमाणात बहाल झालेली आहे, आणि त्या अनुषंगाने तो तो जीव संघर्ष करतो, येणाऱ्या संकटाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो, अहंकार आडवा येतो तो फक्त माणसाच्याच बाबतीत.
स्वतःला विकसित, प्रगत समजणारे आपण नेमके कोणाच्या तुलनेत सरस आहोत, हे उघड करणारी घटना सध्या घडत आहे, किंबहुना ती याअगोदरही अनेकदा घडली आहे परंतु गेल्या काही दशकात निर्माण झालेल्या अवास्तव अहंकारामुळे तिची सल मात्र आता जाणवू लागली.
एका विषाणूने एका क्षणात आपले अस्तिस्त्व, आपले सामर्थ्य, आपला अहंकार धुळीस मिळविला आहे.

कसा करणार आहोत आपण याचा सामना, विज्ञानालाच सर्वस्व मानणारे आपण काही दिवसातच काही मायक्रॉन आकार असलेल्या विषाणू पुढे गारद झालो. काही दिवसात त्याच्यावरही पर्याय आपण शोधू, पण ही कहाणी इथेच नक्कीच संपणार नाही, भविष्यात देखील याची पुनरावृत्ती होणार आणि पुन्हा एव्हढाच संघर्ष करावा लागणार यात शंका नाही.
माणूस खरं तर परस्पर तुलनेत बलाढ्य आहे, भौतिक सुखसोयी कोणाकडे जास्त आहे, पैसा कोणाकडे जास्त आहे वगैरे वगैरे गोष्टींतून आपण एकमेकांचे सामर्थ्य ठरवत असतो. म्हणजेच आपली प्रगती सापेक्ष आहे.
आपल्या शरीरात नेमकी काय शिरते आणि त्यानंतर ते काय करते इतपत आपल्या विज्ञानाने आपल्या नक्कीच मदत केली आहे. आणि त्यावर विजय मिळविण्यासाठी काय करता येईल, अर्थात हे देखील आपण विज्ञानानेच शोधणार आहोत पण तोपर्यंत होणाऱ्या नुकसानीला आपण कसे थांबिवणार हा मोठा प्रश्न आहे, आणि सगळी धावपळ त्यासाठीच असावी.

“विज्ञान म्हणजे तरी काय हो, तुमच्या आमच्यातील काही चौकस लोकांनी प्रामाणिक पणे म्हणजे उघड्या डोळ्यांनी निसर्ग समजून घेतला, त्याच्या घडामोडी, त्याच्या प्रक्रिया यांचे सूक्ष्म निरीक्षण केले आणि काही अंशी आपण त्याचा आपल्या कामासाठी उपयोग करू लागलो, हे विज्ञान.”

“नैसर्गिक प्रक्रियेच्या विरोधात जाऊन भौतिक सुखवस्तूंचे निर्माण म्हणजे तंत्रज्ञान. आणि आपल्याला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी, आपणच निर्माण केलेले अर्थात तथ्य असलेले नियम म्हणजे अध्यात्म”. म्हणजेच तुमचे विज्ञान अध्यात्माच्या पुढे जात नाही.

असो, विषय हा आहे, आपला अहंकार का दुखावला गेला. त्याचे कारण आहे “माणसाची अकार्यक्षमता, त्याची कमजोरी, त्याच्याकडे आहे त्यालाच सर्वस्व मानण्याची प्रवृत्ती, जवळील भौतिक सुखवस्तूंच्या जीवावर मी कसा सर्व श्रेष्ठ, अशी मानसिकता या सर्वांचे मिश्रण म्हणजे अहंकार.”
साहजिकच आहे तो एका क्षणात आणि शुल्लक कारणानेच दुखावला जातो. खरं तर अश्यावेळी माणूस मूर्खपणा करण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तो करतोच.
निसर्गाने, आपल्याला बुद्धीचे दान दिले आहे आणि म्हणूनच आपल्या ठायी जसा अहंकार आहे, तसेच बुद्धी चातुर्य, प्रेम भाव, विवेक, प्रसंगावधान इत्यादी गुण देखील आहेत.

आणि संकटकाळी हेच गुण वापरायचे असतात, आज जो चातुर्याने निसर्ग नियमांचा आदर करून त्याच्या विरोधात न जाता आपल्याला दिलेल्या क्षमतेने आहे तिथेच राहील, तो टिकणार आहे.

मित्रानो, काही नियम माहित असणे आणि त्याआधारावर काही निर्मिती जरी आपण केलेली आहे तरी आपण सृष्टीचा कणभर देखील भाग जाणत नाही. आपण कायमच एका काल्पनिक जगात जगात आलेलो आहे, जिथे जे आपल्याला वास्तव वाटत ते एकतर सापेक्ष असत किंवा क्षणिक असत. त्यामुळे अनाठायी अहंकार आणि मूर्खपणा आपल्याला संपविण्यास प्रामुख्याने कारणी भूत ठरतो.

निसर्ग नियमाने जगा, सदगुणी रहा, प्रेमळ रहा, ज्ञानी असाल तर अहंकार टाळा, विज्ञान सुखवस्तूपलीकडे निसर्ग समजून घेण्याचे केवळ एक साधन आहे. त्याला तेवढ्यापुरतेच मर्यादित ठेवा.
आपली बुद्धी हेच आपले सामर्थ्य आहे, असे जर मानत असाल तर, ही संकल्पना तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी कामी येईलच याची शाश्वती नाही. बुद्धीबरोबरच मिळालेल्या सदगुणांचा योग्यवेळी योग्य वापर तुम्हा आम्हाला टिकवू शकतो हे सत्य आहे आणि हेच टिकण्यास मदत करेल.

बुद्धिचातुर्याने निसर्गाने बहाल केलेल्या प्रतिकार क्षमतेचा वापर जो करेल तोच टिकेल, हेच अंतिम सत्य आहे.

संदीप चव्हाण,
गायरस एज्युकेशन, नेवासा.

या कारणामुळे “गायरस रोव्हर्स” बॅच सुरु करायची आहे…

या कारणामुळे “गायरस रोव्हर्स” बॅच सुरु करायची आहे…

मी गेल्या ८-१० वर्षात पाहत आलो आहे कि, तालुक्यातील अभ्यासू, जिज्ञासू आणि मेहनती विद्यार्थी काहीतरी करण्याच्या हेतूने १० वी नंतर बाहेर शिकण्यासाठी जातात. ते प्रवेश इथेच कुठेतरी घेतात आणि प्रिपरेशन साठी शहरातील एखादी मोठी अकॅडमी जॉईन करतात.

खेड्यातून, गेलेल्या या विद्यार्थ्यांना शहरात अड्जस्ट होता होता ३-४ महिने निघून जातात, शिवाय ११ वी समजता समजता देखील बराच वेळ निघून जातो. क्लासमध्ये असलेल्या गर्दी मुळे यांच्याकडेही कुणी लक्ष देत नाही. अश्या अनेक गोष्टीने मुळे बाहेर गेलेल्या ९९% विद्यार्थ्यांना अपयश पाहावे लागते.
“गायरस रोव्हर्स” अश्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना इथेच सर्व काही अगदी शहरापेक्षाही दर्जेदार आणि शाश्वत दिले जाईल.

…आणि म्हणून “गायरस” चे विद्यार्थी सी.ई.टी/नीट मध्ये तालुक्यात सर्वात पुढे असतात.

…आणि म्हणून “गायरस” चे विद्यार्थी सी.ई.टी/नीट मध्ये तालुक्यात सर्वात पुढे असतात.

नेवासा तालुक्यातील खऱ्या अर्थाने “एकमात्र” सायन्स अकॅडमी म्हणजे गायरस, कारण गायरस मध्ये कोचिंग क्लास किंवा शिकवणी पद्धतीने घ्यायचे म्हणून क्लासेस घेतले जात नाही. येथे प्रत्येक विषयास त्या त्या क्षेत्रातील अनुभवी शिक्षक आहे व तो पूर्ण भान ठेवून अगदी बेसिक कन्सेप्ट पासून ते ऍडव्हान्स थेअरी पर्यंत विद्यार्थ्यांना तो विषय शिकवत असतो.
गायरस चे विद्यार्थी तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा पुढे असण्याचे कारण, म्हणजे त्याच्याकडून वेळोवेळी सी.ई.टी/नीट चे पेपर्स सोडवून घेतले जातात, त्यांचा रेग्युलर सर्व सुरूच असतो.
गायरस विषयी आणखी जाणून घेण्यासाठी एक भेट अवश्य द्या.

…तर या कारणांमुळे भारतीय सुरक्षित राहतील.

…तर या कारणांमुळे भारतीय सुरक्षित राहतील.

जगभरात कोरोना धुमाकूळ घालत आहे, अश्यात भारतात देखील कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. कदाचित काही प्रमाणात आणखी रुग्ण सापडतील.
जर भारतीयांनी योग्य काळजी घेतली, तर बाधा झालेल्या रुग्णाची संख्या आटोक्यात ठेवता येईल. सरकार ने देखील वेळीच योग्य पावले उचलली आहेत.

तरीदेखील, कोरोनामुळे भारतात मृत्यूचे प्रमाण जगापेक्षा बरेच कमी असेल. त्याचे कारण इथल्या लोकांची रोग प्रतिकार क्षमता, जीवन शैली.
भारतीयांची रोग प्रतिकार क्षमता, जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा नक्कीच चांगली आहे. तरीदेखील काळजी घेणं गरजेचे आहे.

गायरस एज्युकेशनचा सलग ८ व्य वर्षी यशस्वी “क्रॅश कोर्स”

गायरस एज्युकेशनचा सलग ८ व्य वर्षी यशस्वी “क्रॅश कोर्स”

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेल्या “गायरस सायन्स अकॅडमीने” सलग आठव्या वर्षी नीट/जे.ई.ई./सी.ई.टी साठी क्रॅश कोर्स इम्पलिमेन्ट केला.
यंदाच्या क्रॅश कोर्स मध्ये नेवासा, शेवगाव तालुक्यातील तसेच आजूबाजूचा गाव-खेड्यातील ८० हुन अधिक विद्यार्थी गायरस चा क्रॅश कोर्स करत आहेत.
पालकांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल अकॅडमी पालकांची व विद्यार्थ्यांची आभारी आहे.

एकीकडे महिनाभरात पैसे कमविण्याचा मानस ठेवणाऱ्या क्लासेस ची जत्रा व फी स्ट्रक्चर चे सेल लागलेले असताना, दुसरीकडे गायरस मध्ये रोजचे ८ तास विद्यार्थी कसून सर्व करत आहे, लेक्चर्स करत आहेत, टेस्ट्स देत आहेत.
उशिराने का होईना नेवासा परिसरातील विद्यार्थ्यांना गायरस मधील कोचिंग पद्धतीचा दर्जा समजला आणि त्याचा फायदा देखील ते घेत आहेत.

मुळा – गायरस सी.ई.टी सेल (नेवासा/सोनई)

मुळा – गायरस सी.ई.टी सेल (नेवासा/सोनई)

मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई यांच्या नेवासा व सोनई येथील ज्युनिअर कॉलेजेस मध्ये ११ वी/१२ वी सायन्स स्टेट बोर्ड + नीट/जे.ई.ई./सी.ई.टी पूर्णवेळ स्पेशल बॅच मध्ये प्रवेश देणे सुरु.

बॅचचा एकूण कालावधी : २ वर्षे, ५ मे २०२० ते ३० जानेवारी २०२२
प्रमुख वैशिष्ट्ये:
१) “सी.ई.टी.सेल” च्या विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य कॅम्पस मध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्था, स्वतंत्र प्रॅक्टिकल बॅच, स्वतंत्र टाइम टेबल.
२) फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स व इंग्रजी साठी “गायरस एज्युकेशन प्रा.लि.” चे उच्च शिक्षित, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक.
३) २ वर्षाचे परिपूर्ण “टिचिंग-लर्निंग-प्रिपरेशन” प्लॅनिंग, ऑनलाईन/ऑफलाईन टेस्ट सिरीज, एम.सी.क्यू. प्रॅक्टिस व डाउट सेशन्स.
४) कोटा, लातूरसह अनेक नामांकित अकॅडमीचे परिपूर्ण स्टडी मटेरियल.
५) नीट/जे.ई.ई./सी.ई.टी इ परीक्षांची पहिल्या दिवशीपासूनच तयारी
६) बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना कॅम्पस मध्येच हॉस्टेल व मेसची सुविधा. मुलींसाठी अतिशय सुरक्षित.
७) मे, जून बेसिक फाउंडेशन पासून सुरुवात.
८) नेवासा/सोनई प्रत्येकी ६० प्रवेश.

गेल्या ५ वर्षात तालुक्यातील सर्वोत्तम निकाल, शेकडो समाधानी पालक व शेकडो विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी, ऍग्री, आर्किटेक्चर, पॅरा मेडिकल इ व्यावसायिक शिक्षणात नामांकित कॉलेजेस मध्ये प्रवेश.

महत्वाची सूचना: बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेल/मेस च्या हिशेबाने अगोदर प्रवेश निश्चित करणे अनिवार्य

प्रवेशासाठी आजच संपर्क करा.
सी.ई.टी.सेल,
मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई
प्रा.संदीप चव्हाण.
मो. ९६५७९८८५६०, ९८९०९७०७६८.

Theme: Overlay by Kaira NEWASA | SONAI | SHEVGAON
GEPL
Facebook
Facebook
Instagram
  • Sign up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.